राजकारणातील बहीण भावांची भाऊबीज

Foto

भाऊबीज हा सण बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा आहे. सर्व सामान्यांप्रमाणेच राजकीय नेतेही या दिवशी आपापापल्या कुटुंबासोबत हा दिवस साजरा करतात. राजकारणातील बहीण भावाची प्रसिद्ध जोडी अजीत पवार आणि सुप्रिया सुळे यांची. या बहीण भावाने बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी केली. 

बहीण भावाचे प्रेम अधिक घट्ट करणाऱ्या या सणाबद्दल अजित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे, 'आईनंतर तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी व्यक्ती म्हणजे बहीण. माया, प्रेम, जिव्हाळ्याच्या या नात्याची महती शब्दात व्यक्त करणं अशक्यच.'

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिवाळीच्या उत्साहाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.